प्रतिनिधि , नांदेड : कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी भारतात आजपासुन लसीकरण मोहीमेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. भारतात सात महिन्यांत ३० कोटी नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही आज या लसीकरणाचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा देत हा शुभारंभ केला. यावेळी नांदेडचे जिल्हाअधिकारी विपीन ईटणकर, जिल्हा परिषद सिओ वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा सिव्हिल सर्जन निळकंठ भोसिकर जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर महापौर मोहिनी ताई यवणकर यांच्या उपस्थितीत पहिली लसीकरण लस देण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा या लसीकरणाला आरंभ करण्यात आला. यावेळी नांदेड परिषद सिओ वर्षा ठाकूर, मनपा जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मा रेड्डी यांच्या उपस्थितीत या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
