प्रतिनिधी , पुणे : संपुर्ण जगाचं लक्ष लागुन असलेल्या कोरोनाच्या लसीकरणाला आज सुरुवात करण्यात आली आहे. आज पुण्यातील ८ रुग्णालयांमध्ये मध्ये ८०० मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या सुरुवातीला पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुण्याचे महापौर मुरलीधार मोहळ, तसेच समस्त पालिका कमिटी मेंबर उपस्थित होते. ज्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. त्यांना काही काळासाठी निगरणी ठेवण्यात येणार असल्याच यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले
