जनतेज न्युज

चार ते पाच महिन्यांच्या चिमुकल्याला बेवारस स्थितीत सोडले

प्रतिनिधि , हिंगोली : हिंगोली शहरात एका चार ते पाच महिन्यांचा चिमुकल्या बालकाला निर्दयी मातने बेवारस अवस्थेत सोडून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरात हे बाळ बेवारस स्थितीत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या बाळाला हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून पुरुष जातीचे हे बाळ ठणठणीत अवस्थेत आहे. याबाबत हिंगोली शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.