जनतेज न्युज

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने रोहित वेमुला यांना श्रद्धांजली

प्रतिनिधि , नांदेड : शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड शहर यांच्या वतीने रोहित वेमुला यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राजू सोनसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले रोहित वेमुला यांच्या हत्येचा कट रचणार्‍या आरोपींना अद्याप कुठलीही शिक्षा झाली नाही. त्यांनी स्मृती इराणी यांच्या वरती आरोप केला आहे की, सम्यक आंदोलनाचे सर्वेसर्वा रोहित वेमुला हे विद्यार्थी चळवळीतील एक अग्रेसर विद्यार्थी असुन त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळले, तरी सम्यक आंदोलन नांदेडच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थित होती.