जनतेज न्युज

कोथळी ग्रामपंचायतीवर खडसे परिवाराची सत्ता – खा. रक्षा खडसे

प्रतिनिधि , जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी हे गाव हे गाव माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे आहे या ग्रामपंचायतीवर खडसे परिवाराची सत्ता आली असल्याचे मत भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात होती अकरा जागा साठी निवडणूक लागली असतात अपक्ष उमेदवार हा एक बिनविरोध निवडून आलेला आहे याठिकाणी खडसे परिवाराच्यावतीने पाच जागा व शिवसेनेच्या वतीने सहा जागा लढविल्या गेल्या होत्या त्यापैकी शिवसेनेला पाच जागांवर यश संपादन करण्यात आले आहे त्यामुळे खडसे परिवारास कोथळी ग्रामपंचायतीवर यश मिळवता आले आहे,
कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक हे माझ्याबरोबर नाथाभाऊ ची निवडणूक कशी नव्हती तर खडसे परिवाराची शिवसेनेशी निवडणूक होती व या गावांमध्ये खडसे परिवाराला मानणारा हा खूप मोठा वर्ग आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे