जनतेज न्युज

धडगाव तालुक्यातील अतीदुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली

प्रतिनिधी , धडगाव तालुक्यातील अतीदुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली असून यात 6 जणाचा मृत्यु झाला असून 20 जन जखमी असल्याची प्राथमिक अंदाज आहे.हा अपघात एवढा भीषण आहे की मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे .दरम्यान स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करण्यास सुरूवात केली असून स्थानिक पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहे .जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे .दरम्यान गाडी खोल दरीत कोसळल्याने इतर प्रवाश्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे .या अपघाता वरुण अवैध प्रवाशी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एरनिवर आला आहे ….