जनतेज न्युज

अण्णांच्या मागण्या कशा अयोग्य आहेत, हे सांगण्यासाठी फडणवीस चकरा मारतात – आ. सतिश चव्हाण

प्रतिनिधी , मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सतिश चव्हाण यांचा तिसर्‍यांदा विजय झाल्याबद्दल गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या अण्णा हजारेंची फडणवीसांकडुन मनधरणी करण्यात आली, यावर भाष्य केलं आहे. अण्णा हजारे जेव्हा कॉंग्रेस सत्तेत असतांना आंदोलन करत होते तेव्हा हेच लोक अण्णांचं आंदोलन कस बरोबर आहे, हे पटवूने देत होते. आता अण्णांना हेच लोक तुमचं आंदोलन कस चुकीच आहे हे पटवून देत आहे. असा टोला आ. सतिश चव्हाण यांनी फडणवीसांना लगावला आहे.