जनतेज न्युज

शेतकर्‍यांनी जमिनीत स्वताःला गाडुन घेत केले आंदोलन…

प्रतिनिधी , जळगाव : पारोळा जि.जळगाव : विद्युत रोहिञ मिळत नसल्याने हिरापूर ता.पारोळा येथील शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खड्डा खोदून स्वत:ला मानेपर्यंत गाडून घेतले आहे.
पारोळा तालुक्यातील हिरापूर येथे आज रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आत्मक्लेश आंदोलन झाले. जवळजवळ दहा दिवस रोहित्र जळून सुद्धा तरी शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही. रोहित्रा ची मागणी केल्यावर आधी 80% बिल भरा तरच रोहित्र मिळेल. असे उत्तर वीज मंडळाच्या अधिकारी वर्गाने दिली. त्याच्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत हिरापूर येथील रोहित्र जवळच आत्मक्‍लेश आंदोलन केले. आत्मक्लेश आंदोलनाचे वेळी विठोबा पाटील,मोतीलाल पाटील,जितेंद्र पाटील,भैय्या पाटील, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पारोळा शाखा अभियंता निसार तडवी यांनी दोन दिवसात रोहित्र मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तृर्त मागे घेण्यात आले.