प्रतिनिधी , नांदेड : कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना सुरु झालेल्या इतर शस्त्रक्रिया व दरम्यान कमी पडत असलेला रक्त पुरवठा लक्षात घेऊन भाजपा युवा मोर्चा नांदेड वतीने प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधत गुरुगोविंदसिंग ब्लड बँकेच्या सहकार्याने सिडको ऑटो स्टॉप जवळ 551 रक्तदात्यांनी रक्तदान केले या भव्य रक्तदान शिबीर सांगता मान्यवरांच्या भाषणानंतर झाली . यावेळेस खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख दिलीप कंदकुर्ते कार्यक्रमाचे आयोजक संजय घोगरे पाटील व असंख्य युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते
