प्रतिनिधी , जालना : जालना जिल्ह्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत असुन, या मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करण्यात येत आहेत. आज जालना येथिल चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध केला. तसेच उद्या होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष आर. एस. शिराळे यांनी केले आहे.
