प्रतिनिधी , शिर्डी : महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज शिर्डीमध्ये अग्निशामक इमारत भवन चे उद्घाटन व नामकरण संपन्न करण्यात आले यावेळी मुस्लिम समाज बांधव यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती करून अग्निशामक भवनला डॉ. ए पी जी अब्दुल कलाम नाव देण्यात यावे असे वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत राधाकृष्ण विखे पाटलांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अग्निशामक भवन असे नामकरण करून उद्घाटन केले. यावेळी मुस्लिम बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
