प्रतिनिधी , नांदेड : भुमाता फौंडेशनच्या व युवा राज दामले क्राफ्ट महिला सबली करण साठी काम करीत असताना महिलांच्या मुलींच्या अनेक समस्या समोर येतात अनेक मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळेफक्त आर्थिक कारणांमुळे लग्न रखडले जातात म्हणूनच या पूर्वीपासून आपल्या राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी आम्ही थेट मुलींच्या खात्यात लग्नासाठी मदत म्हणून आर्थिक मदत जमा करण्याचे ठरविले आहे त्यानुसार युवराज दामले क्रापचे युवराज दादा दामले आणि भूमाता ब्रिगेड भुमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून आज फेब्रुवारी2021 मध्ये ज्यांचे लग्न ठरले अशा गोरगरीब गरजू मुलींना पत्रकार परिषदेमध्ये सहा लग्नासाठी प्रत्येकी 15 हजार रुपये देण्यात आला त्यावेळी तृप्ती देसाई यांनी माहूरच्या रेणुका माता मंदिर मध्ये दर्शन घेतले त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की मंदिरामध्ये एकही महिला सदस्य म्हणून अद्याप नियुक्ती नाही त्यानंतर त्यांनी नगरपंचायती मध्ये बैठक घेऊन महिला नगरसेवकांना नगरपंचायती मध्ये ठराव मंजूर करून रेणुका माता मंदिराचे सदस्य होण्याचे आव्हान केले
