प्रतिनिधी , औरंगाबाद : सुंदर माझे कार्यालय अंतर्गत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, २५ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत सर्वांची आरोग्य तपासणी होत आहे. २१ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ‘कार्यस्थळी मन:स्वास्थ्य’ प्रक्रल्पांतर्गत जिल्हा परिषदेत सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या कोव्हीड वॉररूममध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळे दरम्यान ही तपासणी केली केली जात आहे. २५ जानेवारी रोजी सामान्य प्रशासन, वित्त, बांधकाम. आयडीसीएस विभाग तसेच २७ जानेवारी रोजी आरोग्य, समाजकल्याण आणि शिक्षण विभाग तर २८ जानेवारी रोजी पंचायत, पशुसंवर्धन, कृषी, सिंचन, पाणीपुरवठा, मनरेगा, डीआरडीए, एसबीएम या विभागांसह पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
