जनतेज न्युज

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे एक दिवसीय किसान आंदोलन

प्रतिनिधी , औरंगाबाद : शाहीन बाग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने केंद्र सरकारच्या नविन कृषी कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी व दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सिल्लोड येथे एकदिवसीय किसानबाग आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेच शेतकरी विरोधी काळे कायदे केंद्राने रद्द करावे अशी मागणीही करण्यात आली.