प्रतिनिधी , हिंगोली : जीएसटीतील किचकट तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीत देखील व्यापारी व कर सल्लागार संघटनेकडून जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाभरातून व्यापारी व कर सल्लागार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जीएसटीमध्ये देशातील सव्वाकरोडहून अधिक व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु प्रत्यक्षात कर भरताना हि साईट चालत नाही.जीएसटी येउन साडेतीन वर्षे झाली आहेत, परंतु यामध्ये तीनशे दुरूस्ती झाल्या. सरकारने आधी एकदाच काय त्या दुरूस्त्या करून घ्याव्यात, व्यापारी व कर सल्लागारांना अडचणीत टाकू नये,अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
