जनतेज न्युज

महाविहार बावरी नगर येथे उभारल्या जात आहे जगातील सर्वात उंच अशोक स्तंभ…

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या वैभवा आणि भवेत् एक सोनेरी पान जोडले जात आहे नांदेड जिल्ह्यातील बावरी नगर ( ता. अर्धापूर) येथे भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभाची निर्मिती करण्यात आली आहे ह्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पूर्णत्वास होणार आहे
कुठेही नाही इतका मोठा अशोक स्तंभ
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मोऱ्य सम्राट राजा अशोक यांनी आपल्या राजवटीत अशा स्तंभाची निर्मिती शिलालेख लिहिण्या साठी केली होती सारनाथ इथे 50 फूट उंचीचा अशोक स्तंभ आढळतो भारताशिवाय श्रीलंका मॅनमार व चीन या देशात या प्रकारचे अशोक स्तंभ आहेत
पण एवढा अशोक स्तंभ कुठेही नाही
उंची 65 फूट
बावरी नगर दाभड येथील निर्मिती डॉ एस पी गायकवाड यांच्या संकल्पनेतून 2012 पासून होत आहे या अशोक स्तंभची एकूण उंची 65 फूट आहे त्याच्या पायासाठी 19 फूट 6 इंचीची मजबूत चिरेबंदी दगडाची पायाभरणी केली आहे मूळ स्तंभाचे टावर 32 फूट आहे त्यावरील चबुतरा ची उंची 33 फूट वजन 70 टन आहे ज्यामध्ये स्तंभावर सर्वात प्रथम 6 फुटाचे उलटे कमळ आहे कमळावर 4फूट उंचीचा हत्ती. घोडा .बैल .सिंह .यांची शिल्पे व चार अशोक चक्र शिल्प कोरली आहे
काय आहे प्रतीक?
यातील हत्ती शांतीचा. बैल परिश्रमाचा. सिंह शौर्याचा. खोडा हे गती मान्यतेचा. प्रतीक म्हणून कोरल्या गेलेली आहेत त्यावर तेरा फूट उंचीची चारीही दिशांना तोंड असणारी भारतातील स्थापत्य कलेचा नमुना दर्शवणारी सिंहाची चार शिल्पे आहेत शेवटी सर्वात वर दहा फूट उंचीचा 24 आर्याच अशोक चक्र आहे
मध्यप्रदेश येथून आणलेला आहे हा दगड
या संभा साठी मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून वालकष्मा आणला गेला आहे वास्तुकलेचा वारसा दीर्घकाळ टिकविण्यासाठी स्तंभाच्या मजबूत जोडणीसाठी पुरातन काळात ज्या प्रमाणे असंच असे धातु तांबे आणि चुना याचा वापर करण्यात आला आहे