प्रतिनिधी , सोलापूर : मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं हिंदुत्ववाचे पुरस्कार करण्याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांनी स्वागत केलं आहे. मात्र, राज ठाकरेंची जोपर्यंत परप्रांतीयांची भूमिका बदलत नाही तोपर्यंत निवडणुकीत राज ठाकरेंबरोबर एकत्र येणार नाही, असं ही चंद्रकांत पाटलांनी सोलापूरमध्ये म्हटलं आहे.
याचसोबत कर्नाटकमधील आमचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे त्याचा आम्ही निषेध करतो. मोदी – शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाही. मराठी भाषिक 842 गावं हे आपल्या भूभागासह मराठी भाषिक महाराष्ट्रात आलेच पाहिजे.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचा निर्णय होईल. सगळ्याप्रकारे मराठा आरक्षण गाढले जाईल यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी राज्य सरकार कर्नाटक सीमा वाद आणतायेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय.
ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केलाय.
