प्रतिनिधी , यवतमाळ : सध्या कर्नाटकच्या प्रश्नामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. कर्नाटकताील सीमाभाग कुणाचा यावर रणकंदण सुरू आहे. कर्नाटकचा मुंबईवर अधिकार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंती पाटील यांनी केले. वणी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबई-कर्नाटक मुद्यावर विनोद सुरू आहे. मात्र, कनार्टकचा मुंबईवर अधिकार नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
