प्रतिनिधी , सांगली : सांगलीत नृत्य परिषदेकडून नवोदित डान्सर आणि कला दिग्दर्शक यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील नृत्य विशारद आणि कोरिओग्राफर सहभागी झाले होते. नृत्य परिषदेचे अध्यक्ष संतोष माने यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
एकापेक्षा एकचे विजेते सॅड्रिक डिसोझा, विनोद निकम, नृत्य दिग्दर्शक राजेंद्र संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होते. या एकदिवसीय कार्यशाळेत नृत्य क्षेत्रात कसे करिअर करायचे, कोरिओग्राफरची भूमिका काय यासह अनेक महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर डान्सर आणि कोरिओग्राफरची संघटना उभारण्याचा निर्णयही घेणेत आला. कार्यशाळेचे आयोजन नृत्य परिषद सांगली शाखेचे संतोष माने, सुमित साळुंखे, संजय काकडे, फ्युजन अकॅडमीचे सूरज वाघमोडे , ओंकार रोकडे यांनी केले होते.
