जनतेज न्युज

११ वर्षाच्या चिमुकलीचा इंटरनॅशनल डान्स स्पर्धेसाठी चाललेला संघर्ष.

प्रतिनिधी , वर्धा : वर्धा येथील सिंधी मेघे या परिसरातील रहिवासी रागिनी विकास ठाकरे या ११वर्षाच्या मुलीने वयाच्या ५ व्या वर्षापासून संपूर्ण भारतभर नृत्य स्पर्धेत भाग घेऊन आता पर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले, विशेष म्हणजे तिने १० नॅशनल पैकी ६ नॅशनल पुरस्कार हासिल केले असून तिला अकदी दोन वेळा इंटरनॅशनल नृत्य स्पर्धेत सुद्धा जाण्यास चान्स आलेला होता मात्र घरची परिस्तिथी नाजूक असल्या कारणाने ते तिथे जाऊ शकली नाही, तिचे आणि तिच्या परिवाराला हेच वाटते की जर आमची मुलगी इंटरनॅशनल स्पर्धेला जाऊ शकले तर नक्कीच जिंकून येण्याची ताकत ठेवते कारण आता पर्यंत तिने जिथे सुद्धा स्पर्धेत संपूर्ण भारत भर भाग घेतला तिथून ते खाली हाथ अजिबात आलेली नाही.
तरी तिच्या आई बाबांनी शासन दरबारी किंवा एनजीओ कडे एक आशा व्यक्त केली की पुढे जर त्यांचा मुलीचे सीलेक्शन इंटरनॅशनल साठी झाले तर आर्थिक मदत करावी आणि आम्ही गॅरंटी ने सांगतो की आमची मुलगी त्या चान्स च सोन करून दाखवेल, आणि भारताचे नाव आणि महाराष्ट्राचे नाव उंच करेल.
विशेष पुरस्कार : नुकताच या वर्षी मिळालेला स्त्री शक्ती पुरस्कार मार्च २०२०
नॅशनल पुरस्कार एकूण ६ :
१) भोपाळ २०१७
२) आग्रा २०१८
३) भिलाई २०१९
४) भोपाळ २०१८
५) हैदराबाद २०१९
६) गोवा गोल्ड मेडल २०१५
एकूण फाईल्स मर्ज करून पाठवले आहेत