जनतेज न्युज

राज्यभरात आज भाजपकडून वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यांवरून आंदोलन

प्रतिनिधी , पुणे : राज्यभरात आज भाजपकडून वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यांवरून आंदोलन केले जात आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील पेशवे पार्क येथील उपविभागीय कार्यालसमोर आंदोलन करण्यात आलंय. ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. धनदांडग्यांना वीज बिल माफ करताय मात्र सर्वसामान्य जनतेला वेठीस कशासाठी धरताय असा सवाल भाजप पदाधिकऱ्यांनी यावेळी उपस्थित केलाय. निदर्शने करत असतांना भाजपने सरकार विरोधी फलक झलकवत महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला भलं मोठं कुलूप लावलं होतं.