जनतेज न्युज

लोणार सरोवराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

प्रतिनिधी , बुलडाणा : लोणार सरोवराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत यापुढे लोणार विकासाचा कार्यक्रम थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यातील लोणार येथे केली आहे.
जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 10 वाजता लोणार सरोवराला भेट दिली. लोणार येथील वनकुटी व्हु पाईन्ट आणि धारातीर्थ गोमुख परिसरात जावुन त्यांनी सरोवराची पाहणी केली. त्यानंतर अधिकार्‍यांची विशेष बैठक घेऊन लोणार विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली यावेळी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर आमदार संजय गायकवाड जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले लोणार सरोवर हे आपल्या सर्वांचे वैभव आहे या वैभवाची चा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही लोणार सरोवराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आता मुख्यमंत्री कार्यालयातून केले जातील वेळोवेळी या विकासाच्या कामांचा आढावा मी स्वतः येईल अशी ग्वाही त्यांनी दिली सोबतच मातृतिर्थ सिंदखेडराजाचा विकास आराखडाची कामे अशाच पध्दतीने संपूर्ण विकास केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले .तसेच पुढे बोलतांना म्हणाले की,लोणार सरोवर हे आपल्या सर्वांचे वैभव आहे या वैभवाची चा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही लोणार सरोवराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आता मुख्यमंत्री कार्यालयातून केले जातील वेळोवेळी या विकासाच्या कामांचा आढावा मी स्वतः येईल अशी ग्वाही त्यांनी दिली सोबतच मातृतिर्थ सिंदखेडराजाचा विकास आराखडाची कामे अशाच पध्दतीने संपूर्ण विकास केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले..