प्रांताधिकारी सचिन बारवकर यांच्या हस्ते विमल आजींना श्रावणबाळ योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रतिनिधी , पाहण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना प्रांत कार्यालया जवळ गेले आणि त्यांना एक 80 वर्षीय आजीने अर्ज लिहायाचा आहे का असे विचारल जेव्हा सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाने आजीला सांगितलं की हे जिल्हाधिकारी आहेत तेव्हा आजी घाबरल्या व पुढे आजींना साहेबांनी ऑफिसला बोलावून मदत केली
विओ गेली अनेक वर्षे आजी प्रांत ऑफिस बाहेर विमल आजी लोकांचे अर्ज लिहून देतात आणि आपली उपजीविका करतात आजी देशमुख साहेबांना भेटल्या आणि त्यांनी जीवनाशी संघर्ष करणाऱ्या विमल आजीच्या अडचणी समजून घेत तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी आजीला श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
विमल लोखंडे आजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर बसून
नागरिकांना अर्ज टाईप करून देण्याचे काम करीत होत्या. मात्र कॉम्प्युटरच्या युगात जुन्या टायपिंग मशीनचा धंदा जवळजवळ बंदच झाला आहे. या आजी एकटयाच असल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. कुठे राहता, कोण कोण असते जिल्हाधिकाऱ्यांनी विचारपूस केली घरी असे प्रश्न विचारत आस्थेने असता विमल आजींचा प्रश्न त्यांनी एक मिनिटात सोडवला जिल्हाधिकारी गेले असता, बाहेरच बसलेल्या आजी त्यांच्याकडे चालत आल्या. यावेळी डॉ. देशमुख यांनी त्यांची विचारपूस केली. डॉ. राजेश देशमुख माहिती घेतली. या आजींना काही वेळ काही कळेनासे झाले, एवढे मोठे साहेब आपली विचारपूसकशासाठी करतात, असे भाव आजीच्या चेहऱ्यावर दिसत होते. आजीसमोरील प्रश्नांचे स्वरुप पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांना आजीला श्रावणबाळ योजना तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करीत बारवकर यांनी तातडीने या योजनेमध्ये सामील करून घेतले आहे. आजीला दर महिन्याला आता एक हजार रुपये मिळणार आहेत.
विओ प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी विमल आजींना श्रावणबाळ योजनेत सहभागी करून घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. प्रांताधिकारी कार्यालयात आजींचा सन्मान करण्यात आला. श्रावणबाळ योजनेचे प्रमाणपत्र मिळाल्याचा आणि महिन्याला नेमके उत्पन्न सुरू झाल्याचा आनंद आजींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
एवढे दिवस काम केल्याचं फळ मिळालं अस आजी सांगतात
