जनतेज न्युज

नवापुर तालुक्यातील पोल्ट्री फार्मचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव आल्यानंतर प्रशासनाच्यावतीने कुक्कुट पक्षी नष्ट करण्यास सुरुवात.

प्रतिनिधी , नंदुरबार : नवापुर तालुक्यातल्या चार पोल्ट्री फार्मचे बर्डप्ल्युचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तब्बल पंधरा वर्षांनी नंदुरबार जिल्ह्यात बर्डप्ल्युचा शिरकाव झाला आहे. मागच्या आठवड्या्यात नवापुर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये प्रमाणापेक्षा अधिक कुकुटपक्षांच्या मृत्यु झाल्याने जवळपास चार पोल्ट्री फार्म मधील अहवाल तपासणी कामी भोपाळ मध्ये पाठवड्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्याने याठिकाणी बर्डप्ल्युचा शिरकाव झाल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे. चार पोल्ट्री फार्म मधील जवळपास चार लाख कोबड्यांची कत्तल करून प्रशासनाच्या प्रशासनाच्या वतीने सुरुवात झाली आहे. तर या फार्मच्या परिसरातील १२ अन्य पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोंबड्या देखील धोकादायक क्षेत्रात समावेश झाला आहे. एकट्या नवापुर तालुक्यात २८ पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास साडे नऊ लाख कुकुटपक्षी आहेत. या साऱया निर्णयाने कुकुटपालन व्यपंवसायीकांचे मात्र अतोनात नुकसान होणार असुन २००६ च्या बर्डप्ल्यु नंतर कसबस उभारी घेत असलेला हा व्यवसायाच पुन्हा कंबरड मोडल जाणार आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन नवापुर तालुक्यातील अंडी, कोबडी मास विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. तर नवापुर तालुक्यात कोबड्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसात पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथक नंदुरबारमध्ये दाखल झाले असून उर्वरित 22 पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचे अहवाल देखील पाठवून रिपोर्ट पॉझिटिव आल्यास किलिंग ऑपरेशनला सुरुवात करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.