जनतेज न्युज

वाशीम मध्ये विधवा महीलाच्या हळदी कूंकूवाचा कार्यक्रम

प्रतिनिधी , वाशीम : आजही समाजात विधवा महिलेला अपरिचित प्रथा, परंपरा यांचा आधार घेत तिच्या वैधव्याची जाणीव करून दिली आहे…..या कटू अनुभवांना आपल्या जीवनात सामोरे जावे लागत असतात या अपघाताने ऐन तारूण्यातच वैधव्य आलेल्या महिलेला कुटुंबात दुय्यम स्थान असते. कुटुंबातील शुभकार्य तसेच सणासुदीच्या काळात त्यांना एकटेपणाची जाणीव होते…. या बुरसटलेल्या विचारांना छेद देण्याचं धाडस वाशिमच्या शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या किरण गिर्हे या रणरागिणींनी केले आहे…..ऐन तारूण्यात वैधव्य आलेल्या 30 महिलांना एकत्र करत किरण गिर्हे यांनी मकर संक्रातीचे वाण व गिफ्ट या महिलांचा सत्कार केला आहे…यातील अनेक महिला कित्येक वर्षानंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या….याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता……