जनतेज न्युज

नांदेड येते रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत चित्ररथाद्वारे जनजागृती

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने ३२वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ रस्ते वाहतूक नियम विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अभियानाच्या निमित्ताने आज प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या वतीने जिल्ह्याभरात रस्ता सुरक्षा पर जनजागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री डी. पी. सावंत जिल्हाधिकारी विपीन इटनकर प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.