जनतेज न्युज

इंधन दरवाढ विरोधात क्रांती चौकात युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

प्रतिनिधी , औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून डिझेल, पेट्रोल, गॅसचे दरांनमध्ये प्रचंड वाढ होतांना दिसत आहे. यामुळे आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील पेट्रोल पंप येथे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या संदर्भात निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारने सांगितले होते की, अच्छे दिन आयेंगे परंतु अच्छे दिन आले नसून जनतेचा विश्वास घात केला असल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. जर अशीच भाव वाढ होत राहिली तर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही केंद्र सरकारला देण्यात आला.
इंधनच्या दरात दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस ची दरवाढ कमी केली पाहिजे. आजची सर्वसामान्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. एकीकडे उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत. लोकांचे रोजगार गेलेले आहेत. आणि दुसरीकडे इंधनाचे भावांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची परिस्थिती हलाखीची होतांना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले.