सुशांत सिंग प्रकरणात fir दाखल होऊ शकते तर पूजा चव्हाण मध्ये का नाही
प्रतिनिधी , पुणे : प्रसिद्ध टिक टोक स्टार पूजा चव्हाण हिचा मृतदेह संशयित रित्या तिचे वानवडी येथील राहते घराचे पार्किंग मध्ये आढळून आजतागायत तब्बल सात दिवस होऊन देखील पोलीस प्रशासनाद्वारे कोणत्याही इसमाच्या विरुद्ध कारवाई न करता केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणात काही वरिष्ठ लोकांची नावे प्रसार माध्यमांमध्ये व सोशल मीडियामध्ये प्रसारित होत असून सुद्धा प्रस्तुत प्रकरणात पोलिसांनी पूजा चव्हाण हिची हत्या करण्यात आली अथवा तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले याबाबत कोणताही शोध न घेता गुन्हा दाखल न करता तपास केलेला नाही. विशेष म्हणजे राज्यतील मंत्र्यांची नावे प्रस्तुत प्रकरणात समोर आलेनंतर मंत्री महोदय फरार झालेले आहे. म्हणून, ॲड विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वकिलांनी वानवडी पोलीस स्टेशन येथे धाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 174 अन्वये दाखल करण्यात आलेल्या अनैसर्गिक मृत्यूच्या नोंदी नंतर पोलिसांनी अनेक संशयितांची नावे समोर येऊन देखील गुन्हा दाखल न करता योग्य तो तपास केला नसल्याची बाब एडवोकेट विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितलेली आहे. तसेच गुन्हा दाखल करून निपक्षपाती तपास केल्यास पुरावा समोर येऊन दोषीस शिक्षा व मयतास न्या य मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी वर्तविली आहेत. तसेच पोलिसांनी काहीही कारवाई न केल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावले मयतास न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देखील वकिलांमार्फत देण्यात आले आहेत.सुशांत सिंग प्रकरणात जर fir दाखल झाली आहे .तशी fir यात दाखल करावी अन्यथा आम्ही कोर्टात धाव घेऊ अस वकिलांनी सांगितलं
