जनतेज न्युज

मुंबईच्या आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकांना औरंगाबाद शहरातील पालकांनी दिला पाठिंबा

प्रतिनिधी , मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिक्षकांनी आपल्या मागण्या साठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद शहरातील पालक समोर आले
मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या काही दिवसापासून शिक्षकांचे आंदोलन चालू आहे त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे असे विद्यार्थ्यांच्या पालकाचे मत आहे. आणि यासंदर्भात आज औरंगाबाद शहरातील पालकांनीसुद्धा शिक्षकांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आता सरकारने शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे नसता मुंबईच्या आझाद मैदानावर पालक ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशाराही पालकांनी यावेळी सरकारला दिला.