प्रतिनिधी , कोल्हापूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना बंदी घातल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यावर चांगलेच संतापले आहेत. कर्नाटक सरकार अडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हाला देखील कर्नाटकचे प्रवासी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल. असा इशारा देत केंद्र सरकारला याबाबत माहिती देऊ असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.
