प्रतिनिधी , बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथ एकाच दिवशी तब्बल 155 कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हयात एकाच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेने गावात जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे.प्रशासनाने संपूर्ण गाव कंटेनमनेत झोन घोषित केले आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या झाडेगाव या 1428 लोकसंख्या असलेल्या या गावात कोरोनाची संख्या जास्त असल्याने निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.गावातील 11 टक्के नागरिक कोरोनाग्रस्त असून गावाचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेय .. गावात मागील 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पारायण सोहळा आयोजित केलेला होता .. तेथूनच कोरोनाची सुरुवात झालीय .. सुरुवातील याठिकाणींच्या 2 महिला कोरोनाग्रस्त निघाल्या गावात ताप , सर्दी खोकला सुरु झाला , तेव्हा लोकांनी डॉक्टरांकडे धाव घेतली असता प्रकार समोर आलाय आणि गावात 155 रुग्ण आढळले .. तर अजूनही 50 जणांचे अहवाल बाकी आहेत.गावात प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे..
प्रशांत तायडे(ग्रामस्थ) जळगाव जामोद या आदिवासी बहुल तालुक्यातील झाडेगाव येथे कोरोना ने एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासन स्थितीवर नियंत्रण करण्यास सज्ज आहे..
