प्रतिनिधी , यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड आज सकाळी नागपूर मार्गे मुंबईला कॅबिनेट मिटींगला उपस्थित राहण्यासाठी निघाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सगळं सुरळीत झाला आहे. मी माझ्या कामकाजाला आजपासून सुरुवात करीत आहोत असे सांगितले. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत वनमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे म्हटले होते. यावर या विषयावर मला काहीही बोलायचे नसल्याची प्रतिक्रिया दिली. तर पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने यावर बोलताना मी लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये असे आवाहन केले होते. मात्र, गर्दी जमली. नागरिक अजूनही गंभीरपणे कोरोनाला घेत नाही आहे. मात्र आजपासून मी माझ्या कामकाजाला सुरुवात करीत असल्याचेही ते बोलले.
