प्रतिनिधी , कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे महाविकास आघाडी सरकारच लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापुरातील शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण सुरू केलय.. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळा झाले आज दिवसभर त्यांचे आंदोलन सुरू असेल.. आंदोलनाला बसण्यापूर्वी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई चं दर्शन घेतलं.. प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्जमाफीची घोषणा महा विकास आघाडी सरकारनं करून एक वर्ष झालं मात्र या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.. सरकारला शेतकऱ्यांची फसवणूक तात्काळ थांबवावी अशी मागणी घाटगे यांनी केलीय..तसेच प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, वीजबिल माफी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली।
