जनतेज न्युज

पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरामुळे सिल्लोड आले मेटाकुटीला, दर कमी करण्याची मागणी.

प्रतिनिधी , गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल चे दर वाढले आहेत सिल्लोड येथे पेट्रोल 98.30 तर डिझेल 88. 03 रुपये असल्याने सर्वसामन्यां नागरिक मेटाकुटीला आले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल, गँस,डिझेल व जिवनावश्यक वस्तुचे भाव हे गगनाला भिडलेत,महागाई मुळे ट्रान्सपोर्ट च्या भावात दरवाढ झाली,घर व बांधकाम साहीत्य यांचे भरमसाठ दर वाढलेत अन्न,वस्त्र,निवारा या बरोबर जीवनावश्यक वस्तुचे भाव वाढल्याने गोर गरिबांचे जगने मुश्कील झाले आहे. या पार्श्भुमीवर सिल्लोड येथील नागरिक चांगलेच हैराण झाले असून दरवाढी संदर्भात RNO ला काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.