जनतेज न्युज

नगरसेवक कुणाल पाटील सह रिक्षा चालकाला अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप

नगरसेवक दिल्लीला असताना कल्याणमध्ये अपहरण करणार कसे
मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तपास सुरु

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : पैशाच्या कारणावरुन एका रिक्षा चालकाला अपहरण करुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात माजी अपक्ष नगरसेवकासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवशी नगरसेवक दिल्लीत असताना डोंबिवलीत कसे काय अपहरण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.
कल्याण पूर्व भागातील देशमुख होम्समध्ये राहणारा सुमित सिंग या रिक्षा चालकाने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार राजन दुबे या व्यक्तीकडून त्याने 30 हजार रुपये उसनवारीवर घेतले होते. बहुतांश रक्कम त्याने परत केली आहे. मात्र काही पैसे परत करणे बाकी होते. वेळेवर पैसे देऊ शकला नाही म्हणून राजन दुबे यांच्यासह त्याच्या सहकारा:यांनी सुमित याला बेदम मारहाण केली. या मारहाणीची एक व्हीडीओ सुद्धा व्हायरल झाले आह
या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले आहे
मात्र या तक्रारीमध्ये अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर सुद्धा आरोप केले आहेत. कुणाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सुमित याचे अपहरण करुन कुणाल पाटीलकडे घेऊन गेले. त्याठिकाणी पाटील यांनी त्याच्या थोबाडीत लगावून पैसे राजनला परत कर असे सांगितले. सुमितने त्या सोबत घडलेला प्रकाराची तारीख 19 फेब्रुवारी सांगितली आहे. 19 फेब्रुवारी रोजी कुणाल पाटील हे दिल्लीला न्यायालयीन कामकाजासाठी गेले होते. याबाबत कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे की, मला विनाकारण त्रास दिला जात आहे. जे आरोप लावले आहेत. त्यात काही एक तथ्य नाही. घटनेच्या दिवशी मी दिल्लीला होतो. पोलिस सखोल तपास करुन मला न्याय देतील. याआधीही माझ्याविरोधात अशी खोटी तक्रार केली गेली आहे आणि त्यात मी निर्दोष झालो आहे इतकेच नाही तर जेव्हा मी दिल्लीला असल्याचा खुलासा केला तेव्हा. फिर्यादीने पलटी मारली आहे की, ही घटना 17 तारखेला घडली आहे. तपासात जे काही सत्य आहे ते समोर येईलच. मात्र माझ्या कुटुंबियांसोबत मी खुलासा करणार आहे की, ठाणे जिल्ह्यातील काही नेते माझ्या विरोधात कटकारस्थान करीत आहेत.