जनतेज न्युज

थकीत घरभाडे मागणाऱ्या वृद्ध मालकाला लाकडी दंडक्याने जबर मारहाण करून स्मशानभूमीत निघून जाळण्याची धमकी दिली .

तसेच जबरदस्तीने कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी चार जणांना अटक केली . तर तीन जण फरार आहेत .
प्रतिनिधी , पंढरपूर : निवृत्त शिक्षक शिवाजी नवले यांच्या अपार्टमेंट मध्ये आरोपी भाड्याने राहत होते . 19 फेब्रुवारी रोजी आरोपींनी मालकास सांगोला बाजार समिती समोर बोलवून घेतले . “तू माझ्या पत्नीला फोन का करतो , तुझ्यावर गुन्हा दाखल करतो “असे धमकावत मारहाण केली आणि त्यांचे अपहरण करून जबरदस्तीने स्मशानात घेऊन गेले. याठिकाणी पुन्हा मारहाण करून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी वीस लाख रुपये आणि एक फ्लॅट नावावर करून देण्याची मागणी केली. निवृत्त शिक्षक शिवाजी नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात संशयित आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे ,अपहरण, खंडणी यासारखे गुन्हे दाखल केले आहेत . सात पैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून फरार तीन आरोपींचा शोध सुरू आहे .