जनतेज न्युज

प्लास्टिक द्या, अन स्टेशनरी घ्या.कोल्हापूर महानगरपालिकेचा राज्यातील पहिला उपक्रम

प्रतिनिधी , कोल्हापूर : प्लास्टिक कचरा मुक्त कोल्हापूर मुक्त करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नामी शक्कल लढवली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी ही अनोखा उपक्रम असणार आहे.राज्यात पहिल्यांदा हा उपक्रम राबवणार आहे. प्लास्टिक द्या आणि स्टेशनरी घ्या असा उपक्रम राबवत आहेत.
लहानांची पर्यावरणाबद्दल गोडी वाढावी-आयुक्त कादंबरी बलकवडे
लहान मुलांना व विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे.प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला प्रतिसाद देत प्लास्टिक जमा करून स्टेशनरी घ्यावी,असे आवाहन आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी केले.