जनतेज न्युज

शहरातील मोठाल्या आवाज करणाऱ्या बुलेटवर शहर पोलिसांची कारवाई.

प्रतिनिधी , धुळे : मोठ मोठाले आवाज करणाऱ्या धुळे शहरातील बुलेट चा आवाज शहर पोलिसांनी आता बंद केला आहे. आज धुळे शहर पोलिसांनी आठ बुलेट गाड्या पकडून त्यांचे मोठाले आवाज करणारे सायलेन्सर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
धुळे शहरातील बुलेट कंपनी कडून आलेले मूळ सायलेन्सर काढून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसून संपूर्ण शहरात नागरिकांना हा त्रास देण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बुलेट स्वार करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अशा बुलेट गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार धुळे शहर पोलिसांनी आज या कारवाईस सुरुवात केली.
या कारवाईत धुळे शहरात मोठे आवाज करणाऱ्या आठ बुलेट यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्येच त्या बुलेटचे सायलेन्सर काढून मूळ सायलेन्सर त्या बुलेटला बसवण्यात आले आणि बुलेट स्वारांकडून मोठा दंड वसूल केला आहे. अशी माहिती धुळे शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नितीन गायकवाड यांनी दिली. त्यामुळे आता धुळे शहरात मोठाले आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांना पोलिसांची धडकी भरली आहे.