पालक मंत्री सुभाष देसाई यांनी संजय राठोड विषय बोलण्यास दिला नकार
प्रतिनिधी , शहराच्या दोन दिवस दौर्यात आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान सिडकोतील एमजीएम परिसरात प्रियदर्शिनी उद्यानातील ऑक्सीजन पार्क ची पाहणी केली .
त्यानंतर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला यासह आवश्यक असलेल्या बाबींविषयी इंजिनियर अशी चर्चा केली व हे काम गतीने करण्यात यावे अशा सूचना नाही यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की या उद्यानातील एकही झाड तोडल्या जाणार नाही या ठिकाणी नवीन झाडे लावणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले
तसेच संजय राठोड विषयी प्रश्न विचारताच पालक मंत्री सुभाष देसाई यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला
यावेळी महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय , प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, आमदार अंबादास दानवे मुख्य अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
