जनतेज न्युज

राज्यात १७ जणांच्या आत्महत्या, तर जिल्ह्यात ५० हजार पेक्षा जास्त बेरोजगार, मंडप डेकोरेशन कर्मचाऱ्यांची स्थिती

प्रतिनिधी , कोल्हापूर : कोरोनाकाळात लग्नसराईला बंदी आल्यानंतर राज्यात १७ जणांनी बेरोजगारीमूळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती ऑल महाराष्ट्र टेंट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी दिली. तसेच केटरिंग, फ्लॉवर, लाईट, मंडप यासह व्यवसाय संबंधित जिल्ह्यातील ५० हजार पेक्षा जास्त रोजंदारी कर्मचारी बेरोजगार झाले, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. राज्य सरकारने यांचा गांभीर्याने विचार करून अपेक्षित निर्णय घ्यावेत, अशी मागणी सागर चव्हाण यांनी केली.
देशात कोरोनाचा वेगाने प्रसार सुरू झाल्यानंतर मार्च मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, लग्नसमारंभ अशा सर्वच कार्यक्रमावर बंधी घालण्यात आली. यामुळे उदरनिर्वाहाची सर्वच साधने बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली. देशाची आर्थिक स्थिती कोसळत असताना हळूहळू लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करून लग्न समारंभ अशा कार्यक्रमांना मर्यादित उपस्थित असा नियम ठेवण्यात आला.