जनतेज न्युज

मुंबई कशामुळे अंधारात गेली होती? या गोष्टीचा आज खुलासा होणार;ऊर्जा मंत्री नितीन राऊतांची माहिती

प्रतिनिधी , मुंबई : आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला.पहिला दिवस हा श्रद्धांजलीपर प्रस्तावासाठी मर्यादित असल्याने आज विधानसभेचे काम अवघ्या दोन तासात समाप्त झाले.या दरम्यान राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी,’ज्यावेळी संपूर्ण मुंबई अंधारात होती,तेव्हा मी सूतोवाच केला होता की,हा काहीतरी घातपात आहे.आज या गोष्टीचा संध्याकाळी रिपोर्ट येणार असून सायबर विभाग पत्रकार परिषदेतून सर्व सत्य आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे’, असे मत मांडले.
मात्र,यावेळी त्यांनी वाढीव वीज बिलावर बोलणं टाळल्याचं चित्र पाहायला मिळालं.