जनतेज न्युज

अमरावती करांनो सावधान कुटुंबात एक पॉझिटिव्ह आल्यास अख्खं घर होणार पॉझिटिव….डॉ निकम

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोना ने थैमान घातलेलं आहे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सध्या राज्यात सर्वाधिक आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाव्हायरस ने आपले म्युटेशन बदलल्याने अति जलद गतीने कोरोना पसरत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे व याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निकम यांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.घरात एका सदस्याला कोरोना झाल्यास संपूर्ण घरातील सदस्यांना कोरोना झाल्याचे शहरात अनेक उदाहरण असल्याचीही कबुली जिल्हा शल्या चिकित्सक यांनी दिली . पिडीएम सी चे डीन व जिल्हा सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांना कोरोणची लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली.त्यामुळे नागरिकांनी कोरोणाला हलक्यात घेऊ नये असे आवाहन डॉ निकम यांनी केले आहे.