जनतेज न्युज

कोबीला दर नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या..

प्रतिनिधी , सातारा : शेतात लावलेल्या कोबी पिकाला बाजारात दर मिळत नसल्याने वाढे गावच्या शेतकऱ्याने उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत.. पीक लागवडीसाठी जेवढा खर्च केला त्याच्या निम्मेही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत… कोबीला बाजारात 2 रुपयांहून कमी दर असल्याने त्याची बाजारात वाहतूक करणे पण मुश्किल झाल्याने पिकातच मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या आहेत..