प्रतिनिधी , मुंबई : उरली सुरली शिवसेनाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, योगींचा रोड शो कशासाठी? आता यांना काय समजणार रोड शो? जे अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर पडले नाही. यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो वर्षा ते मातोश्री, तोही कोरोना झालेला असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावर.
घरात बसणारे बाहेर फिरणार्यांवर टीका करतात तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. क्या तुम भी संजुभाऊ? असे म्हणंत भारतीय जनता पार्टीच्या भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे.
