जनतेज न्युज

शिर्डी साईबाबांच्या दानपेटीत नवीनवर्ष व नाताळ निमित्त १७.८१ कोटी रुपयांची देणगी

प्रतिनिधी , अहमदनगर : साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २५ डिसेंबर २०२२ ते दिनांक ०२ जानेवारी २०२३ याकालावधीत सुमारे ०८ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.८१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्रमुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.श्री.जाधव म्‍हणाले, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त दिनांक २५ डिसेंबर २०२२ ते दिनांक ०२ जानेवारी २०२३ याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ०८,७८,७९,०४८/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ०३,६७,६७,६९८/- रुपये, डेबीट क्रेडीट कार्डव्‍दारे ०२,१५,१८,४९३/- रुपये, ऑनलाईन देणगीव्‍दारे ०१,२१,०२,५३१/- रुपये, चेक/डिडीव्‍दारे ९८,७९,९७३/- रुपये व मनी ऑडरव्‍दारे ०३,२१,६५३/- रुपये अशी एकुण १६ कोटी ८४ लाख ६९ हजार ३९६ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ०१ किलो ८४९ ग्रॅम (रुपये ९०,३१,१६७/-) व चांदी १२ किलो ६९६ ग्रॅम (रुपये ०६,११,४७८/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्‍यमातुन एकुण १७ कोटी ८१ लाख १२ हजार ०४१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.