प्रतिनिधी , जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी बनत हरी नामाचा जयघोष करत वरणगावातून दिंडी सोहळा काढलाआज आषाढी एकादशी पंढरीच्या पांडुरंगाची यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षापासून ही यात्रा पंढरीत भरत नव्हती व शाळा ही बंद होती त्यामुळे शाळेतील चिमुकल्यांचा दिंडी सोहळा बंद होता परंतु आज आषाढी एकादशी निमित्त वरणगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी हरिनामाचा जयघोष करत स्कूल पासून ते गणेश मंदिरापर्यंत पालखी घेऊन दिंडी सोहळा काढला यामध्ये साक्षात विठ्ठल रुक्मिणी देखणं रूप या चिमुकल्याने साकारलं होतं
