जनतेज न्युज

ठाणे करांनी अनुभवला शून्य सावली दिवस

प्रतिनिधी, ठाणे : आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही,  असे म्हटले जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असेल असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना “शून्य सावलीचा दिवस” असे म्हटले जाते. मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेतला, दुपारी १२ वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे मराठी विज्ञान परिषदेतर्फे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली गेली.  मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण व कार्यवाह प्रा. ना. द. मांडगे यांनी  मार्गदर्शन केले. तरी सर्वांना  उपस्थित रहण्याचे आव्हान मराठी विज्ञान परिषदेतर्फे करण्यात आले होते.