जनतेज न्युज

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय मध्ये पदभरतीतील घोटाळेबाजांवर कारवाई करा, मागणीसाठी विद्यार्थी युवक संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण….!

प्रतिनिधी , अकोला : अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कंत्राटी पदभरतीतील कथित घोटाळेबाजांवर तसेच त्यांना अभय देणाऱ्या उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ व मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.