जनतेज न्युज

अकोला जिल्हाचा विकास झाला भकास यासाठी युवकाचे आंदोलन

प्रतिनिधी, अकोला : अकोला जिल्ह्यातील महत्वकांक्षी प्रकल्पांची कामे गेल्या 4 ते 5 वर्षापासून अपूर्णाअवस्थेत आहेत. तर रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे जिल्ह्यातील नागरिक हैरान झाले आहेत.तर शेतकरी पिक विम्याच्या लाभापासुन वंचित आहे.तर शेतकरी कर्जमाफीच्या लाभा पासून वंचित आहे आणि दुष्काळी ची मदत निधी मिळणार तरी कधी आणि ग्राम झुरळ खुर्द हे गाव आधिवासी म्हणून घोशित करा.अन्यथा गावाला रस्ता द्या. तर जिल्हाचे पालकमंत्री हरवले आहेत. त्यामुळे आज अकोलेकरांना अर्धवट कामाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोर उरळ येथील युवक गोपाल पोहरे या युवकाने जिल्हाचा विकास झाला भकास यासाठी मै हू अकोला चे बॅनर अंगात घालून आणि पोस्टर हातात घेऊन आंदोलन केले आहे