जनतेज न्युज

अकोला जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करूनही किडीचा प्रादुर्भाव कमी होत नाही

प्रतिनिधी, अकोला : अकोला जिल्हात बहरलेल्या सोयाबीन पिकावर वाढलेला अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतो, मात्र कीटकनाशकांची खरेदी करताना सावध होणे गरजेचे आहे.अन्यथा बोगस कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊन उत्पादनातही घट निर्माण होऊ शकते.ऑगस्ट 2022 च्या अखेरपर्यंत कृषी विभाग व जि. प. कृषी विभागामार्फत तब्बल 99 नमुने हे प्रयोगशाळेत पाठविले होते.त्यामध्ये तीन अहवाल फेल आले आहे. सद्य:स्थितीत अळींचा प्रादुर्भाव व रोगराई थांबविण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. त्यामुळे बोगस कीटकनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कीटकनाशकांचे 99 नमुने घेतलेजिल्हा कृषी कार्यालय व जि.प.कृषी विभागामार्फत कीटकनाशकांचे 99 तुमने हे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 67 रिझल्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये तीन कीटकनाशकांचे नमुने फेल आले आहेत.
विक्री केंद्रअकोला जिल्हात 453 सध्या ग्रामीण भागात फवारणीला वेग आला आहे.कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी तब्बल जिल्हाभरात 453 विक्री केंद्रे आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्री केंद्रातून कीटकनाशकांची खरेदी करावी असा सूचनाही देण्यात आल्यात.जिल्ह्यात जे गुणवत्ता दर्शक असतात ते विविध ठिकाणी जाऊन कीटकनाशकांचे नमुने घेत असतात. त्यातील तीन नमुने हे फेल आलेले आहेत.जे गुणवत्ता निरीक्षक आहेत ते योग्य कारवाई करतील.तर शेतकऱ्यांना एक विनंतीही केली आहे की किटकनाशके घेताना ते कृषीसेवा केंद्रावरून घ्यावे, आणी घेताना नाव बिलावर तारीख जरूर पहावी.आणि बॅच नंबर,प्लॉट नंबर पहावा. आणि फक्त बिल घ्यावा जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जाभरूनकर यांनी दिली आहे.पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होत आहे म्हणून शेतकऱ्याने फवारणी केली पण या फवारणीचा कुठेही फायदा झालेला दिसून येत नाही उलट त्या फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाला आहे आणि किड ही वाढली असल्याची माहिती उरळ येथील शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी दिली असून या बोगस कीटकनाक्षक कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.